सामाजिक

युवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

दि.०५/०६/२०२१,

सादळे,

पर्यावरण दिनानिमित्त सादळे (ता. करवीर ) येथील सिद्धेश्वर डोंगरात ८०० देशी वृक्षांचे रोपन पेठ वडगावच्या युवक सेवा फाउंडेशनच्या वतीने केले.

वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले. मात्र युवक सेवा फाउंडेशनच्या वतीने मागील दोन महिने अगदी उभ्या डोंगरात वृक्षारोपणासाठी खड्डे काढले होते. आज पर्यावरण दिनानिमित्त पिंपळ, वड, चिंच, लिंब अशा वेगवेगळ्या ८०० देशी झाडांचे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.या उपक्रमात तरुणांनी सहभाग घेतला होता. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या तरुणांनी केला आहे.

दररोज सकाळी सहा वाजता तेे या डोंगरात वृक्षारोपणाचेेेे काम करतात यावेळी फाऊंडेशनचे राजेंद्र जाधव, किरण चौगुले, महेश पाटील अभिजीत मनेर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close