सामाजिक

रेशन ची माहिती आता मोबाईल वर कळणार

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, 

मुंबई प्रतिनिधी: पांडुरंग पाटील

मुंबई ,दि.१८/०३/२०२१.

रेशनिंगबाबतच्या वाढत्या तक्रारी व शिधाधारकांना रेशनिंगची माहिती मिळावी यासाठी हेल्पलाईन व ई-मेल आयडी शासनाकडून जनतेला यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिधावस्तू उपलब्धतेच्या सनियंत्रणमध्ये पारदर्शकता यावी. तसेच जनतेत जागरूकता यावी यासाठी शासनाकडून नवनवीन प्रयत्न केले जात आहेत. आता तर सर्व माहिती मेरा रेशन अँप (Mera Ration App) च्या माध्यमातून जनतेला मिळणार आहे.

केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड या धोरणाची नुकतीच अंबालबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या धोरणामुळे देशातील सर्व रेशन कार्ड एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मखाली आणली जात असल्यामुळे रेशनकार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे. वन नेशन वन रेशनकार्डच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला किती धान्य मिळणार आहे, कधी घेतले होते इत्यादीची माहिती मेरा रेशन अँप (Mera Ration App) च्या माध्यमातून घरबसल्या मिळणार आहे.

मेरा रेशन अँप (Mera Ration App) हे आपल्या मोबाईलमध्ये चालू कसे करायचे त्याची माहिती आपण घेऊया.

१) Mera Ration App प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा. गुगल प्ले स्टोस्वर तुम्हाला Central AEPDS Team ने डेव्हलप केलेले अॅप मिळेल.

२) App डाऊनलोड झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर मागितला जाईल.

३) नंबर टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

४) मग तुम्हाला रेशन कार्डसंबंधी सर्व माहिती समोर दिसू शकेल.

५) तसेच या अॅपवर युजर्सना गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती मोबाईलवर मिळू शकेल.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close