सामाजिक

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील,

दि.१३/०५/२०२१.

कोल्हापूर:-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशासह महाराष्ट्रात दररोज मृत्यूचे आकडे उच्चांक गाठत आहेत. त्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा महाराष्ट्रात नव्हे तर देशातील सर्वाधिक मृत्यूदर आहे. कोरोना मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक का आहे याचा टास्क फोर्सनी अभ्यास करून प्राथमिक निष्कर्ष समोर आणला आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन कारणे समोर आली आहेत.

1) कोल्हापुरात सध्या अनेक कोरोनाबाधित रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्यामुळे घरी त्रास वाढू लागल्यावर रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र तोपर्यंत बराच कालवधी निघून गेलला असतो. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. असा पहिला निष्कर्ष टास्क फोर्सने माहितीनुसार काढला आहे.

2) मला काय होत नाही या आत्मविश्वासमुळे कोल्हापूरातील ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील नागरिकांचा बेफिकीरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग शहरासह गावागावात झपाट्याने वाढत आहे. यामुळे आरोग्य सुविधा कमी पडत आहे. त्यामुळेही मृत्यूदरात वाढ होत आहे.

3) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या संसर्गामुळे दररोजच्या वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी व खाजगी अशी सर्वच रुग्णालय फुल्ल होत आहेत किंबहूना झाली आहेत. रुग्णांना उपचार वेळेत न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊन मृत्युदर वाढत आहे. असे तिसरे कारण टास्कफोर्सने दिले आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाला काही सूचना व सुधारणा टास्कफोर्सकडून सुचवण्यात आल्या आहेत. यासाठी टास्कफोर्सने कोल्हापूरमधील विविध रुग्णालयाचा आढावा घेतला त्यामध्ये छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय (सीपीआर) व इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाचाही समावेश आहे. या विविध रुग्णालयाची पाहणी करून माहिती घेतली. या तपशीलवार माहितीनुसार मृत्यूदर लवकर कमी कसा करावा याबाबतच्या सूचना टास्कफोर्सने प्रशासनाला दिल्या आहेत.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close