सामाजिक

पुण्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय

लग्न सोहळा, हॉटेल, रेस्टॉरंट, शाळा व महाविद्यालयाबाबतही मोठा निर्णय-

महाराष्ट्र लाईव्ह न्युज : जोतिबा डोंगर

मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील 

 

पुणे:- कोरोना साथीला नियंत्रणात ठेवण्यास राज्यांस मोठ्या प्रमाणात यश आले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचं दिसून आले आहे. यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्या-त्या स्थानिक प्रशासनाला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. त्याप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत असलेल्या शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत पुण्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लग्नसोहळा, हॉटेल, रेस्टॉरंट, शाळा व महाविद्यालयाबाबतही मोठा निर्णय-समारंभ, लग्न सोहळे व इतर कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. लग्न सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आता लग्न समारंभासाठी 200 जणांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त लोक उपस्थित असतील तर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला. तसेच पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे पुण्यातील कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

पुण्यात ज्या प्रमाणात कोरोना संसर्गाची अलीकडच्या दिवसात वाढ होत आहे, त्या संसर्गाला रोखण्यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close