सामाजिक

पालक मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभापुर मध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

टोप प्रतिनिधी 

दि.१२/०४/२०२१.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संभापूर गावामध्ये आज सोमवार १२ एप्रिल रोजी बंटी पाटील युवा मंच व सावकर ग्रुप यांच्यामार्फत तसेच लोकनियुक्त सरपंच प्रकाश झिरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर तसेच गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सुमारे ५१ रक्तदात्यांनी रक्तादान केले तर ४५ महिलांनी आपले आरोग्य तपासणी केली. अर्पण ब्लड केंद्र कडुन या रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी देवदुत झिरंगे, तानाजी भोसले, आकाश माडेकर, दिनेश निखम, सूरज झिरंगे, प्रमोद झिरंगे, अवधूत झिरंगे, तुकाराम झिरंगे, हेमंत पाटील, सचिन झिरंगे, शंकर झिरंगे, सनी पाटील, ग्रामसेविका आस्मा मुल्ला, ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close