सामाजिक

जोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन

ठोस निर्णय न झाल्यास लाक्षणिक उपोषणाचा इशारा

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

गेल्या काही दिवसांपासुन जाकवेल ते गायमुख रस्त्याशेजारी उत्खनन सुरु आहे, पावसामुळे सर्व माती रस्त्यावर पसरली आहे,
त्यामुळे टू व्हीलर स्लीप होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे
लोकाच जीव जायची पाळी आली आहे.
सध्या जॉकवेल शेजारी रस्ता खचला आहे. त्यानंतर शेवताई कॉर्नर ला उत्खनन झाल्यामुळे
मुसळधार पावसामुळे माती रस्त्यावर वाहुन येत आहे.त्यानंतर गायमुख मार्गावर ही अशीच परिस्थिती आहे. रस्ता अपुरा असल्यामुळे
वाहनधारकांना जीव मुठीत घेवुन प्रवास करावा लागतो, काही ठीकाणी रस्त्यांना भेगा पडल्या आहेत . तटबंदी नाही, दिशादर्शक फलक नाहीत.

त्यानंतर जोतिबा पासुन ३-४ किमी वर रस्त्याला मध्येच खुप मोठी भेग पडली आहे.

तसेच मुद्दा येतो तो गिरोली ते यमाई रस्त्याबाबत
सदर रस्त्यावर पॅचवर्क झाल तेही नित्कृष्ट दर्जाच तो रस्ता कधीही तुटुन जाऊ शकतो अशी अवस्था आहे.
तसेच त्याच शेजारी डोंगरातून
मोठे मोठे दगड दिसत आहेत तेही मोठया प्रमाणात पाऊस झाल्यानंतर खाली पडणार. आपले विभाग या रस्त्यावर अपघात व्हायची वाट
पाहत आहे का?? की कोणाचा जीव जाण्याची??

असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोतिबा डोंगर शाखा यांनी केले.सदरच्या कामाचा ठोस निर्णय लवकरात लवकर घेऊन कामाला प्रारंभ करावा, अन्यथा १ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण केले जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांना मनसे कोल्हापूर जिल्हा चित्रपट सेना सचिव व जोतिबा डोंगर शाखा प्रमुख रोहित संभाजी मिटके यांनी निवेदन सुपूर्द केले.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close