सामाजिक

अवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं

हृदय पिळवटून जाणारी घटना, दि.२०/०५/२०२१

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

शाहूवाडी प्रतिनिधी : पांडुरंग पाटील,

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊन अनेक लोक यामध्ये दगावली गेली आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाने या लाटेत अनेक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत. अनेकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात शिरशी या गावांमध्ये घडली आहे.शिरशी येथील झिमुर कुटुंबीयांचा कोरोनाने घात केला. अवघ्या 13 तासात अख्खं कुटुंब कोरोनाने संपवलं.

मनाला चटका लावणारी व हृदय पिळवटून टाकणारी घटना शिरशी गावातील झिमुर कुटुंबात घडली आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईला इंजिनिअर असणारा मुलगा गावी आला होता. त्यावेळी आईला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे तो गावीच थांबला. त्यावेळी त्याच्या वडिलांनाही कोरोनाची लागण झाली. या दोघांच्यावर उपचार सुरू होते. त्याच दरम्यान इंजिनिअर मुलालाही कोरोनाचा संसर्ग झाला. आई वडिलांची प्रकृती सुधारत असताना अचानक तब्बेत बिघडली. त्यामध्ये पहाटे ५ वाजता वडील, संध्याकाळी ५ वाजता आई आणि त्यानंतर ६ वाजता मुलगा असे १३ तासात संपूर्ण कुटुंबातील लोकाचे निधन झाले. झिमुर कुटुंबातील आई, वडील, मुलगा आणि पुतण्या असा चौघांचा मृत्यू झाल्याने शिरशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

झिमुर कुटुंबातील मृत्यू झालेले वडील मुंबईतील गिरणी कामगार म्हणून निवृत्त झाल्यानंतर पत्नीसह गावी स्थायिक झाले होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असा त्यांचा परिवार होता.आहेत. दोन्ही मुलीची लग्न झालेली आहेत तर मुलगा मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याचेही एक वर्षा पूर्वी त्याचे लग्न झाले.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close