धार्मिकधार्मिक

जोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावट?भाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..?भाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था.
२८फेब्रुवारी पासून होणार खेट्यांना प्रारंभ

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर
दि.२०/०२/२०२१.

जोतिबा डोंगरावर येत्या २८ फेब्रुवारीपासून खेट्यांना (रविवार) सुरवात होणार आहे .पण सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे खेट्यांवर कारोनाचे संकट आले आहे .गेल्यावर्षी मार्च मध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने

       प्रशासनाने धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला तब्बल आठ महिने मंदिरे बंध ठेवली होती जोतीबावर मनाच्या शेवटच्या खेट्या वेळी मंदिरे बंद करन्यात आली. यानंतर जोतिबाची सर्वात मोठी असणारी चैत्र यात्रा देखील रद्द केली. लागोपाठोपाठ श्रावण महिन्यातील नागपंचपमी दिवशी असणारी षष्टी यात्रा देखील रद्द केली . दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर प्रायोगिक तत्वावर मंदिर खुले करण्यात आले या दिवसा पासून शासनाच्या अटी शर्थीनुसार मंदिर दर्शनासाठी खुले केले मंदिरे चार महिने झाले खुले असताना राज्यात पुन्हा कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा लॉकडॉऊन होण्याची चर्चा नागरिकांत होत आहे यातच येत्या 28 फेब्रुवारी पासून जोतिबाच्या मानाच्या खेटे (रविवार) सुरू होणार आहेत 

सध्या राज्यात आणि जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असल्याने जोतिबा खेट्यावर अनिश्चितता दिसून येत आहे जिल्हा प्रशासनाने अद्याप निर्णय जरी घेतला नसला तरी खेटे होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह उद्भवलेले आहे.त्यामुळे भाविक आणि दुकानदार वर्गांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close