राजकीय

जरा मुंबईकडून शिका – सुप्रीम कोर्टाने फटकारले

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील

.

नवी दिल्ली-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. राजधानी दिल्लीतील ऑक्सिजन पुरवठ्याच्या आदेशाचे पालन न केल्याच्या कुचराईमुळे दिल्ली उच्च न्यायालयाने बजावलेल्या अवमानना नोटिशी विरोधात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज सुनावणी झाली.

ऑक्सिजन पुरवठा संकटाच्या मुद्द्यावरील सुनावणीमध्ये न्यायालयाने असे म्हटले आहे, की आदेशाचे पालन करणे, ही केंद्राची जबाबदारी आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्रवाई करा. सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन पुरवठा सुररीत होणार नाही किंवा ऑक्सिजन येणार नाही. तर ऑक्सिजनचा पुरवठा करून लोकांचे जीव वाचविण्यावर आपल्याला जास्त लक्ष केंद्रीत करावे लागेल.

मुंबईच्या बीएमसीने कोरोना काळात छान काम केले आहे. अशामध्ये दिल्लीने त्याच्याकडून काही तरी शिकायला हवे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राजधानी दिल्लीतील ऑक्सिजन संकटावर सल्ला दिली, की वैज्ञानिक पद्धतीने याच्या वितरणाची व्यवस्था करण्यात यावी. दिल्लीत कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. एवढेच नाही, तर गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या ऑक्सिजन पुरवठासंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारणा केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटले आहे की, आम्ही बफर स्टॉक तयार करण्याचे संकेत दिले होते. दिल्लीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत केले जाऊ शकते, तर दिल्लीमध्ये का नाही. निश्चितपणे दिल्लीतही असे केले जाऊ शकते. 700 मेट्रिक टन ऑक्सिजन दिल्लीला केव्हा आणि कसा मिळेल, हे सोमवारपर्यंत सांगा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close