राष्ट्रीय

एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

राशिवडे प्रतिनिधी : सुहास निल्ले

दि.०२/०६/२०२१.

एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात (World Scientist and University Rankings-2021) गोरेवस्ती, (सदशिवनगर) येथील डॉ. अनिल हनुमंत गोरे यांना जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळाले आहे. या संस्थेमार्फत जगातील नामांकित शास्त्रज्ञांची यादी गुगल स्कॉलरचा आधार घेऊन जाहीर करण्यात आली आहे. क्रमवारी ठरवताना शोधनिबंध, एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स, संशोधन संबंधित रिव्युव्हर व पेटंट्स इ. निकषांचा आधार घेण्यात आला आहे. सदर जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश आहे. या जागतिक क्रमवारीमध्ये स्थान मिळवणारे प्रा. अनिल गोरे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामधून सन २०१३ साली पीएचडी प्राप्त केलेली आहे, तसेच स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनीरिंग, दक्षिण कोरिया येथून त्यांनी पोस्ट डॉक्टोरल संशोधन केलेले आहे. त्यांनतर त्यांना २०१६ साली भारत सरकाराच्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा मार्फत (Young Scientist Fellow, DST, New Delhi), प्रतिष्ठित अश्या असणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ते सध्या सुरत येथील उका तरसाडीया विद्यापीठातील (UTU) रसायनशास्त्र विभागामध्ये सहायक प्राध्यापक आहेत. त्यांना ८ वर्षे संशोधनामधील अनुभव आहे. फ्लूरोसेन्ट नॅनोमटेरिअल सेन्सिंग, इलेकट्रोस्पन नॅनोफायबर, कार्बन आधारित नॅनोमेटेरिल्स, UV ब्लॉकिंग फिल्म, पॉलिमर हैड्रोजेल व पाणी शुद्धीकरण उपाययोजन इ. क्षेत्रांमध्ये त्यांनी दर्जेदार संशोधन केले आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी ३ पेटंट्स, ३ बुक चॅप्टर्स व ५० पेक्षा जास्त शोधनिबंध जागतिक स्तरावर प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांच्या या कार्याचा इतर संशोधक संदर्भ घेत असतात. डॉ. गोरे हे सामाजिक भान जपत पाणी प्रदूषण व त्यावरील उपाययोजना यावर आपल्या चर्चासत्रांमधून लोकांपर्यंत जनजागृती करत असतात.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close