गावकट्टा

जोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

दि.०८/०३/२०२१.

जोतिबा डोंगर येथे ८मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम महिला राष्ट्रवादी पार्टीच्या प्रदेशाअध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी महिला पन्हाळा तालुका अध्यक्षा आणि वाडीरत्नागिरी च्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ.राधा कृष्णात बुने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

घराचा गाभा स्त्री असून ती सुशिक्षित झाल्यास घर सुधारते, आणि घर सुधारले की गाव सुधारते यासाठी स्त्रियांनी  प्रथम शिक्षित आणि कर्तत्ववान व्हावे असे मनोगत सरपंच सौ.राधा बुने यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला वाडीरत्नागिरी येथील प्रथम महिला पोलीस स्वाती झुगर, ऍडव्होकेट कु.स्नेहल सांगळे,बचत गटाच्या एस.आर.पी.सौ छाया सांगळे,MSRLMBCC आदित्या कंदूरकर, डॉ.नीता मोहिते, प्राथमिक आरोग्य केंद्र सिस्टर सौ. शशिकला धंगेकर या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत वाडीरत्नागिरी चे ग्रामसेवक श्री जयसिंग बिडकर, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला उपस्थित होत्या.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close