गावकट्टा

जोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”

 

दि.२९/१०/२०२०.

  • श्री जोतिबा डोंगरावर गर्द घनदाट झाडी विखुरलेली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आहेत तसेच साप ,घोनस ,नाग ,फुरसे तसेच इतर विषारी बिनविषारी साप सापडत असतात.जोतिबा डोंगरावर कड्यालगत असलेल्या भागात” “विटेकरी बोवा” हा दुर्मिळ जातीचा साप सापडला.
    रात्री अकराच्या सुमारास हा साप वस्तीमध्ये जखमी अवस्थेत आढळला .नागरिकांनी तात्काळ सर्प मित्र विक्रम चौगले यांना बोलवून घेतले त्यांनी या सापाला पकडले मांजराच्या हल्ल्यात हा साप जखमी झाला असल्याने त्याला वन्यजीव बचाव प्रमुख प्रदिप सुतार यांना संपर्क साधून ताब्यात दिले.पुढील उपचारासाठी वनविभागाचे वन्यजीव वैद्यकिय अधिकारी संतोष वाळवेकर यांच्याकडे पाठवले या कामी अमित कुंभार,सानिका सावंत,यश खबाले हे मदत करत आहेत.हा साप लांबून अजगराच्या पिल्ला सारखा भासतो.चकचकीत नरम शरीर आणि मान ही शरीराच्या मानाने बारीक असते. शरीरावर काळपट तपकिरी किंवा गडद तपकिरी लहान-मोठ्या ठिपक्यांची नक्षी असते .लहान डोळे व हुबेहूब बाहुलीच्या प्रमाणे आणि गांडूळाप्रमाणेच शांत असतो.
    हा महाराष्ट्र गोवा कर्नाटकातील पश्चिम घाट येथे आढळून येत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close