क्रीडांगण
उद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .
विना प्रेक्षक होणारी ही इतिहासातील पहिलीच स्पर्धा .

दि.18/10/2020, क्रिकेट मधील सर्वात मोठी समजली जाणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही क्रिकेट स्पर्धा , दरवर्षी मार्च ते एप्रिल या महिन्यामध्ये होत असते,पण या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून क्रिकेट बोर्डाने या वर्षी होणारी 13 वी आयपीएल क्रिकेट श्रुंखला ही यूएई मध्ये घेण्यात आली आहे ,ही स्पर्धा दि.19 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे गत विजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन बलाढ्य संघाच्या सामन्याने स्पर्धेची रंगतदार सुरुवात सायंकाळी 7:30 वाजता अबुधाबी येथील मैदानावर होणार आहे.ही स्पर्धा विना प्रेक्षक होणार असल्याने प्रेक्षकांना टी व्ही वरच या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.