सामाजिक
नियम पाळा लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर
मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील
मुंबई:- राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा दररोज झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन सूरु होणार आहे की नाही अशा संभ्रमामध्ये लोक होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधून अफवांना पूर्णविराम दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केलेल्या भाषणात म्हणाले की, आपल्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. दुसरी लाट दारावर धडका मारत आहे. त्यानुसार उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे.
येणाऱ्या दोन महिन्यात आणखी एक- दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे आतापर्यंत कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. त्यामुळे लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार आहे. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळणे अत्यंत आवश्यक आहे. याअनुषंगाने “मी जबाबदार” ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार. असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे नऊ मुद्दे-
१) दैनंदिन आकडे सात हजारकडे पोहचले आहेत. राज्यात दुसरी आली आहे की नाही हवं ८-१५ दिवसात कळेल. दुसरी लाट दारावर धडका मारत आहे.
२) सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रां इ. कार्यक्रमावर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे. पक्ष वाढवा पण कोरोना नाही.
३) ज्यांना लॉकडाऊन हवा असेल ते विना मास्क फिरतील. लॉकडाऊन हवा की नको हे तुम्हीच मला सांगा, यासाठी आठ दिवस वाट पाहणार. नियमांचे पालन करा. याअनुषंगाने “मी जबाबदार” ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
४) आताचा कोरोनाचा पीक किती असेल याची मला चिंता आहे.
५) कोरोनावर आताही औषध नाही आणि त्यावेळीही नव्हते. आता मात्र लस उपलब्ध असल्यामुळे नऊ लाख लोकांना लस दिली गेली आहे.
६) लसीचे नियोजन केंद्र सरकार करते त्यामुळे बाकीच्या लोकांना लस कधी मिळणार माहीत नाही.
७) सुरुवातीला लसीबाबत गैरसमज होते मात्र कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत, त्यामुळे लस बिनदास्त घ्या.
८) मीसुध्दा व आपण सगळे थोडे शिथिल झालो होतो. कोरोनाचा पीक खाली-वर होत असतो. ज्यावेळी खाली येत असतो त्यावेळी थोडे थांबावे लागते.
९) वर्क फ्रॉम होमला जास्तीत जास्त प्राधान्य द्या. कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे.