सामाजिक

स्थानिक कुकशेत गावातील तरूणांना बेरोजगार करणाऱ्या हर्डीलिया कंपनी विरोधात उपोषण

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील

दि.१९/०२/२०२१.

नवी मुंबई:- ठाणे – बेलापूर ही आशिया खंडांतील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत. या औद्योगिक वसाहतीसाठी नवी मुंबईतील स्थानिक रहिवाशांच्या जमिनी आदिग्रहित करण्यात आल्या होत्या. याच नवी मुंबई शहराचा अविभाज्य घटक असणाऱ्या कुकशेत गावातील ग्रामस्थांनी आपल्या पुढच्या पिढीला रोजगाराच्या वाटा उपलब्ध होतील या आशेने एम. आय. डी. सी ला 1972 साली आपल्या शेत जमीनी दिल्या. शासनाने जमिनी आदिग्रहित केल्यानंतर या ठिकाणी एस. आय. ग्रुप ची कंपनी अस्तित्वात आली. संस्थेपासून या कंपनीच्या व्यवस्थापनाने कुकशेत गावातील नागरिकांना दिलेला शब्द पळाला नाही. आजही दिलेल्या लिखित आश्वासनाची पूर्तता न झाल्याने त्याचप्रमाणे इतर विषयावर व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष न घातल्याने उद्या शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी जनांच्या हक्कासाठी हर्डीलिया कंपनीच्या मुख्य गेट समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्थानिक भूमिपुत्र तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी दिला.

1972 साली एम आय डी सी प्राधीकाराने कुकशेत एम आय डी सी क्षेत्राच्या निर्मितीकरता उपक्रमासाठी माध्यमातून स्थानिकांच्या शेतजमीनि अधिग्रहण केल्या आहेत. आपल्याला पुढ्च्या पिढीला काही न काही तर एक चांगला आधार मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सरळ हाताने आपल्या जमीनी शासनाला एम आय डी सी ला दिल्या. त्यानंतर एम आय डी सी क्षेत्रातील कंपनीच्या निर्मितीसाठी स्थापित झालेल्या

कुकशेत गावाच्या शेत जमिनीवर उभारण्यात आलेली हर्डीलिया केमिकल्स कंपनीच्या रासायनिक त्रासामुळे जीवितहानी होऊ नये. त्याकरीता सन 1995 हायकोर्टामध्ये केलेल्या अपीलच्या अनुषंगाने शेत जमीनी देणाऱ्या कुकशेत गावचे पुनर्वसन करण्याचे माननीय उच्च न्यायालयाने आदेश झाले. तत्पूर्वी सन 1972 साली स्थानिकांच्या शेत जमिनीच्या मोबदल्यात तरुणाना रोजगार उपलब्ध झाला. गावातील ग्रामस्थांनी एम आय डी सी ला शेत जमिनी दिल्या आणि त्या मोबदल्यात ज्या नोकरांना नोकरीत समाविष्ट करण्यात आले होते आज ते सेवानिवृत्त झाले आहे. परंतु त्यांच्या वारसांना नोकरीतून सामावून घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनकडे वारंवार पाठपुरावठा करून देखील त्यांच्याकडून कोणत्याही सहकार्यांची भूमिका घेतलेली नाही. यामुळे स्थानिक भूमिपुत्र माजी नगरसेवक सूरज पाटील, ग्रामस्थ व सहकारी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

उपोषनकर्त्याच्या प्रमुख मागण्या :
▪️संदीप हेमंत पाटील या युवकांला दिलेले लेखी आश्वासनाची त्वरित पूर्तता करून नोकरी देण्यात यावी.
▪️ज्या ग्रामस्थांनी अजून ट्रेनी म्हणून वेळ वाढवून ठेवली आहे त्यांना त्वरित कायम स्वरूपी कामगार म्हणून रुजू करण्यात यावे.
▪️मंदीर व इतर पुर्नवसीत गावतील विषयांमध्ये हर्डीलिया कंपनीने स्वतःची जबाबदारी स्वीकारवी
▪️कुकशेत गावच्या संपादित जमीनीवर कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पात कुकशेत ग्रामस्थांचा नोकरीमध्ये समाविष्ट करण्याचा लेखी करारनामा यावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close