सामाजिक

सन 2021-22 च्या आर.टी.ई.एक्ट. 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

दि.०४/०३/२०२१.

 

मुंबई प्रतिनिधी: पांडुरंग पाटील

 

नवी मुंबई-

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 21 (अ) नुसार सन 2021-22 शैक्षणिक वर्षाकरीता अल्प संख्यांक शाळावगळून मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक शाळांध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली च्या वर्गात 25% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.

त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रवेशासाठीच्या पात्र शाळांची यादी, शाळेचा प्रवेशस्तर, आर.टी.ई. प्रवेशाची क्षमता व मदत केद्रांची यादी www.nmmc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच सदर माहिती शासनाच्या www.student.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरही उपलब्ध आहे.

पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज दिनांक 03 मार्च 2021 ते 21 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन स्वरुपातwww.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार दाखल करावेत.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close