सामाजिक

संभापूर मध्ये ग्रामपंचायत तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा :  जोतिबा डोंगर

दि.०९/०३/२०२१.

टोप प्रतिनिधी

कुटुंबाची जडणघडण व संस्कारशील समाजाच्या निर्मितीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून महिलांनी आपल्या कुटुंबासह गावाच्या विकासासाठी सक्रिय असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती डॉ प्रदीप पाटील यांनी संभापूर ग्रामपंचायत मार्फत आयोजित महिलादिनानिमित्त बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

सरपंच प्रकाश झीरंगे यांनी गावात राबविलेल्या विकासकामामुळे तालुकास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक आला असुन आता आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कार मिळविण्यासाठी पूर्ण
क्षमतेने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, स.पो.नि. किरण भोसले यांची भाषणे झाली.

यावेळी उपसरपंच ज्योती भोसले, सर्जेराव मोहिते, स्वरूप भोसले, अवधूत झीरंगे, तानाजी भोसले, केंद्रप्रमुख विजय दिवाण, ग्रामसेविका आसमा मुल्ला यांचे सह ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सुशांत भंडारे यांनी केले.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close