सामाजिक

वारणानगर येथे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ यांच्या वतीने सहकारी जगतच्या विशेषांकाचे प्रकाशन

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा: जोतिबा डोंगर

टोप प्रतिनिधी:

सहकारी संस्थांन मधील होणारे बदल आणि धोरणात्मक परिवर्तन याचा आढावा सहकारी जगतच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सहकार चळवळ समोर येत असल्याचा आशादायक विचार वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपून कोरे यांनी व्यक्त केला. वारणानगर येथे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या सहकारी जगतच्या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील हे होते.
महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचां अभ्यास यावरील सहकारी जगत च्या विशेषांकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना निपुण कोरे म्हणाले बदलत्या धोरणानुसार सहकारांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ लागले आहे. सहकारामध्ये सामान्य माणसांचे स्थान कमी होत असून याला जबाबदार सरकारी यंत्रणा आहे. अनेक वर्षांपासून सहकार व सहकारी संस्थांची असलेली परंपरा ही सध्या च्या धोरणात्मक निर्णयामुळे खिळखिळी होण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी सर्वच स्तरावर अभ्यास होणे आवश्यक आहे. यावेळी बोलताना डॉ प्रताप पाटील म्हणाले सहकारी जगत च्या अंकातून सहकारातील विविध विषयांची हाताळणी केली जाते त्या माध्यमातून सहकाराबद्दल चे प्रबोधन करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.सुरज चौगुले यांनी केले.

यावेळी वारणा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद कोरे तसेच वारणा शिक्षण संस्थेचे विश्वस्त बाबासो पाटील, वारणा सहकारी बँकेचे संचालक व वारणा महाविद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते आभार डॉ.भारत उपाध्ये यांनी मानले.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close