सामाजिक
लगोरी फाऊंडेशन चा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सखीच्या जल्लोषात साजरा

महाराष्ट्र लाईव्ह न्युज नेेेटवर्क : जोतिबा डोंगर ,
क.बावडा प्रतिनिधी : प्रणाली सातपुते
दि.१७/०२/२०२१
कोल्हापूर,
संपूर्ण जगभर लॉक डाऊन करण्यात आला होता. या संपूर्ण काळामध्ये सखी घरी बसून होत्या. सखीच्या हक्काचे व्यासपीठ लगोरी संस्थेने संक्रांतीच्या हळदी कुंकू चा कार्यक्रम ठेवून सखीच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. याचे संपूर्ण श्रेय लगोरी फाउंडेशन च्या अध्यक्षा शुभांगी साखरे व त्यांच्या सहकारनिंना जाते. हा कार्यक्रम नूतन मराठी शाळेच्या हॉलमध्ये मंगळवारी 3 ते 6 या वेळेमध्ये करण्यात आला. शायरी, उखाणे, देशभक्तीपर गाणी, फॅशन शो, लकी ड्रॉ अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन सखीनी धमाल करत बक्षिसांची ही लयलूट केली. फॅशन शो या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक धनश्री जाधव, द्वितीय क्रमांक वर्षा जोशी, तृतीय क्रमांक रेणुका केकतपुरे यांनी पटकावला.
कार्यक्रम साठी डी. वाया. एस. पी. स्वाती गायकवाड मॅडम, वैशाली महाडिक (आनंदीबाई संस्थेचे अध्यक्ष), डॉ. स्मिता गिरी, संध्या घोटणे (महिला काँग्रेस शहर अध्यक्ष प्रमुख )पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती कापसे यांनी केले. कार्यक्रमासाठी संयोजन चंदूकाका सराफ यांनी केले. सखीचे आभार मानून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.