सामाजिक

मनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

दि.०८/०७/२०२१

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीला संपूर्ण देश नव्हे ,तर जग झुंज देत आहे. त्याचा फटका देखील श्री क्षेत्र जोतिबा डोंगर वरील ग्रामस्थांना बसला , येथील ग्रामस्थांचा सर्व उदर निर्वाह हा मंदिरावर अवलंबून आहे.
परंतु ते सुद्धा कित्येक महिने बंद आहे ,त्यामुळे लोकांवर उपास मारीची वेळ आली आहे,त्यामुळे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडून कोणत्याही प्रकारचा कर मिळालेला नाही, आणि ग्रामपंचायतीने देखील कोणताही तगादा लावलेला नाही, आणि त्यात भरीस भर म्हणून महावितरण कंपनीने पाणी पुरवठा वीज कनेक्शन तोडले .परिणामी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली, 15 दिवस गावात वीज कनेक्शन तोडल्यामुळे पिण्यासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा तालुका सचिव लखन लादे , आणि तालुका प्रमुख विशाल मोरे यांनी घेतली आणि महावितरण कंपणीला येत्या दोन दिवसात कनेक्शन जोडले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामुदायिक आत्मदहन करण्यात येईल असे निवेदन दिले गेले ,आणि मनसेच्या पाठपुराव्याला अखेर दोन दिवसात यश आले.
महावितरण कंपनीने तात्काळ वीज कनेक्शन जोडले.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close