सामाजिक

भोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

राशिवडे प्रतिनिधी : सुहास निल्ले

दि.३०/०६/२०२१.

शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सारख्या ग्रामीण भागातील रामकृष्ण मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलमध्ये एका महिला रुग्णांवर अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करुन सुमारे सहा किलो वजनाची गर्भाशयाच्या पिशवीची गाठ (कँन्सर) यशस्वीरीत्या काढण्यात यश आले.अशी माहिती रामकृष्ण चँरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ अरुण कणबरकर यांनी दिली.

ग्रामीण भागातील पहिलीच ठरली असणारी ही अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ अभिषेक कणबरकर,डॉ एस व्हि पेंढारकर व भूलतज्ञ डॉ केळवकर मँडम यांना सुमारे तीन तास अथक प्रयत्न करावे लागले.ग्रामीण भागात अत्यावश्यक सुविधा नसतानाही अशा अवघड शस्त्रक्रिया करणे ही मोठी जोखमीची बाब ठरते.तरीही रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अशा अवघड शस्त्रक्रिया नियमित करण्यात येत असतात.

शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कै आर के कणबरकर यांचे डॉ अरुण कणबरकर हे चिरंजीव आहेत.सन १९७६ ला कोल्हापूर शहर सोडून ग्रामीण भागात दवाखाना चालू करणारे ते पहिलेच स्त्रीरोगतज्ञ ठरले आहेत.भोगावती येथे सुमारे २५ वर्षे भोगावती साखर कारखान्याच्या जागेत त्यांचा दवाखाना चालू होता.तर भोगावती येथेच स्वमालकीच्या जागेवर १५ वर्षांपूर्वी त्यांनी मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलची उभारणी केली आहे.डॉ कणबरकर यांच्या पत्नी सौ सुवर्णा या होमिओपॅथी डॉक्टर आहेत.तर चिरंजीव अभिषेक एम एस सर्जन डॉक्टर असून कँन्सर व दुर्बिणीतून शस्त्रक्रिया तज्ञ आहेत.तसेच सून सौ मधूजा भूलतज्ञ एम डी डाँक्टर आहेत.

शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेसह कामगार आरोग्य योजना (ईसीएस),पोलिस कल्याण आरोग्य योजना व सर्व आरोग्य विमा कंपण्यांची कँशलेस सुविधा येथे उपलब्ध आहेत.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close