सामाजिक

फुलेवाडी येथे आनंदमार्ग प्रचारक संघाच्यावतीने आध्यात्मिक आणि सामाजिक सेमिनार कार्यक्रम झाला संपन्न

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

दि.०९/०३/२०२१.

कोल्हापूर प्रतिनिधी : ओंकार लाड

आनंदमार्ग प्रचारक संघ फुलेवाडी सहावा बस स्टॉप यांच्या वतीने सामाजिक व आध्यात्मिक विषयावर 6 व 7 मार्च रोजी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारला आचार्य प्रियतोषानंद अवधुत यांचे मार्गदर्शन लाभले. मनुष्य जीवन हा एक रथच असून यांचे संचालनविवेक रुपी बुद्धीने करावे असे प्रतिपादन त्यांनी केले.

मार्ग गुरू श्री श्री आनंदमूर्तीजींच्या शिकवणीनुसार समाज्याचे नेतृत्व अध्यात्मिक व नैतिक व्यक्तीच्या हाती असल्यास प्राउठच्या माध्यमातून ( प्रगतशील उपयोगी तत्व) सर्वांच्या मूलभूत गरजांची , जस की अन्न, वस्त्र , निवारा, वैद्यकीय सुविधा व शिक्षण यांची सहज पणे पूर्तता होईल व खऱ्या आर्थने रामराज्य या धरतीवर अवतरेल असेही ते म्हणाले या सेमिनारला आबालवृद्धनि याचा लाभ घेतला. या सेमिनारसाठी संतोष कुशे, महेश पोवार, अमर गांजवे, महेश तांबडे, संग्राम शिंदे, सौ अरुंधती तांबडे, सौ पूजा पोवार , आचार्य लक्षता दिदी, यांचे सहकार्य लाभले

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close