सामाजिक

पेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

दि.२८/०५/२०२१.


पेठ वडगांव (प्रतिनिधी ):

वडगांव ता. हातकणंगले येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशा आशयाचे निवेदन वडगांव शहर काँग्रेसच्या वतीने राज्याचे आरोग्य राज्यमंञी मा.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दिले. यावेळी निवेदनाद्वारे असे सांगितले की वडगांव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे आज वडगांव ची लोकसंख्या चाळीस हजार इतकी आहे.
तिथे अनेक मोठी खासगी हॉस्पिटल आहेत तसेच न्यायालय शासकीय कार्यालये मोठी बाजारपेठ आहे, विविध शैक्षणिक संकुल , कृषीउत्पन्न बाजार समिती पोलीस स्टेशन या सर्वामुळे शहरात दररोज हजारो लोकांची ये जा होत असते. शहराजवळची अनेक गावे पेठ वडगांव शहरावर वर अवलंबून आहेत त्यामुळे लवकरात लवकर वडगावं येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारावर उपचार घेता येथील.
यासाठी निवेदन देताना वडगांव शहरकॉग्रेस चे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरज जमादार तसेच सदस्य राहुल माने पैलवान,रमेश पाटोळे इत्यादी उपस्थित होते.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close