सामाजिक

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

 मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील

नेरुळ :

– नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 प्राथमिक शाळेनी शासनाची / नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. सन 2021-22 मधील खालील नमुंमपा क्षेत्रातील 10 अनधिकृत शाळेची यादी दि. 30 जानेवारी, 2021 अखेर जाहीर करण्यात आली आहे.

तरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत, असे पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

अनधिकृत शाळांची यादी

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close