सामाजिक

दख्खनचा राजा मालिकेचा मुद्दा राज दरबारी

मनसे सचिव लखन लादे यांच्या माहितीनुसार

User Rating: 3.85 ( 1 votes)

जोतिबा प्रतिनिधी :कपिल मिटके दि ८/९/२०२०

जोतिबा मालिकेची उत्सुक्ता असंख्य भाविकांना लागलेली आहे.दख्खनचा राजा जोतिबाचे असंख्य भाविक देशभरात आहेत व जोतिबा मालिकेच्या प्रतिक्षेत आहेत.पण या मालिकेची सुरवात कोण करणर हा मोठा प्रश्न पडला आहे.दख्खन केदार एन्टरटेन्टमेंट प्रस्तुत या मालिकेला  प्रथम  सुरुवात केली होती.

 

मालिकेतील निर्माते व दिग्दर्शक हे जोतिबा डोंगरवरील श्री केदार विजय अभ्यासक हे जोतिबा देवाचे वंशपरांपरागत श्री पुजक आहेत .या मालिकेत जोतिबा देवाची सत्य माहिती देवून भाविक भक्तांना याची प्रचिती व्हावी यासाठी मालिका लेखनाचे काम पूर्ण झाले झाले आहे.असे असताना राजकिय दबावात या मालिकेला काहि लोकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

 

असे असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव व जोतिबा डोंगरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लखन लादे यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी हा मुद्दा पत्रव्यवहाराने कळवला .स्थानिक लोकांना या मालिकेची संधी मिळावी व सत्य माहिती प्रस्तुत व्हावी या उद्देशाने सानपाडा नवी मुंबई चे उपविभाग प्रमुख संजय नारायन पाटील यांच्या सोबतीने मनसे तालुका सचिव लखन लादे मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांना या बाबतचे पत्र दिले . आपन मनसैनिकांच्या पाठीशी ठाम उभे राहू असे राज ठाकरे यांनी कळवले व लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.

 

यासाठी पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे ,उपाध्यक्ष नयन गायकवाड ,ॲड. विवेक पाटील ,केदार विजय अभ्यासक संजय आमाणे ,राहूल मिटके यांनी पुढाकार घेतला.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close