सामाजिक

टोल फ्री क्रमांकाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांना नवीन सुविधा उपलब्ध

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील

मुंबई , दि.०२/०३/२०२१.♦

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरतीसंदर्भातील विविध परीक्षेचे नियोजन करत असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना येणाऱ्या ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण अडचणी तसेच शंका निवारण्यासाठी आयोगाने मदत केंद्र (हेल्प डेस्क/कॉल सेंटर) सुरू केले असून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ या टोल फ्री क्रमांकाची सुविधा २ मार्च, २०२१ पासून उपलब्ध करून दिली आहे.

आयोगाने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर ऑनलाईन अर्जप्रणाली, सर्वसाधारण अडचणी व शंकाचे निरासन केले जाणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अथवा सर्वसाधारण अडचणीसुद्धा दूर केल्या जाणार आहेत. या टोल फ्री क्रमांकावरील येणाऱ्या दूरध्वनी संभाषणाचे (Telephone Calls) आयोगाकडून सनियंत्रण व विश्लेषण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे या टोल फ्री क्रमांकाच्या सुविधेव्यतिरिक्त उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी support-online@mpsc.gov.in या इमेल आयडीची सुविधासुद्धा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

आयोगाने ही सुविधा २ मार्च, २०२१ पासून उपलब्ध करून देत असल्याबाबत व वरील टोल फ्री सुविधेच्या वेळापत्रकाची माहिती आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते रात्री ८ आणि शनिवार व रविवारी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत सुरू राहणार असल्याचे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close