सामाजिक

जोतिबा डोंगरावर सामाजिक कार्यकर्ते योगेश भारती यांनी उभारले वीस बेडचे अलगिकरण कक्ष

 

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, 

दि.३०/०४/२०२१.

 

जोतिबा डोंगरावर सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेची बाब निर्माण होत आहे .लोकांना अलगिकरनाची मोठी समस्या उद्भवली जात आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते व जोतिबा बसस्थानका जवळील असलेले हॉटेल द्वारका चे मालक योगेश भारती यांनी पुढाकार घेऊन हॉटेलमध्ये 20 लोकांसाठी कोविड अलगिकरण कक्ष उभारले.

. जोतिबा ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने योगेश भारती याना याबाबत संकल्पना दिली असता तात्काळ विनामूल्य फक्त जोतिबा डोंगरावरील रुग्णांसाठी ही व्यवस्था यांनी केली असून रुग्णांना सर्व सोयीयुक्त प्रशस्त अशी बेडची व्यवस्था केली आहे .जोतिबा वरील रुग्णांसाठी केलेल्या या सुविधेबद्दल ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राधाताई बुने यांनी आभार मानले त्याचा आज पासून शुभारंभ केला आहे .आवश्यक पडल्यास याठिकाणी अँबूलन्स ची देखील व्यवस्था करू असे सामाजिक कार्यकर्ते योगेश भारती यांनी सांगितले यावेळी जोतिबाच्या सरपंच राधा ताई बुने,ग्रामपंचायत सदस्य लखन लादे,तंटामुक्त ग्रामसमिती अध्यक्ष मच्छिंद्र बुने,आनंदा लादे, कृष्णात बुने उपस्थित होते.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close