सामाजिक

जोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

दि.२२/०५/२०२१.

जोतिबा डोंगर वर आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न आता गंभीर बनला असून शासनाकडे पाठपुरावा करून देखील देखील यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे .लसीकरण करताना मोबाईल टॉर्च वापरावा लागतो,तपासणीसाठी डॉक्टर नाहीत ,आणि वाढत्या कोरोना पेशंट मुळे आरोग्य खात्याची डोके दुःखी झाली आहे.

महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेने यामध्ये लक्ष घालून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल सलपे व तालुका आरोग्य अधिकारी कवठेकर यांना संपर्क व मेल द्वारे निवेदन देऊन येत्या पंधरा तारखेपर्यन्त जर आरोग्य उपकेंद्राला सुविधा मिळाल्या नाहीतर चड्डी बनीयनवर आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे .

आरोग्य उपकेंद्रात विदूत प्रवाह जोडणी,कायमस्वरूपी डॉक्टर,आणि ऍम्ब्युलन्स मिळावी ,जोतिबा आरोग्य उपकेंद्रात सध्या अनुभवी असलेले डॉक्टर शेनोलकर यांची कॉव्हिडं काळजी सेंटर पोर्ले येथे नियुक्ती केली आहे .पण सध्या गावातील वातावरण बघता डॉक्टर शेनोलकर यांचीच नियुक्ती जोतिबा आरोग्य उपकेंद्रात व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा तालुका सचिव लखन लादे व चित्रपट सेनेचे जिल्हा सचिव रोहित मिटके यांनी केली आहे

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close