सामाजिक

प्रत्येकाने शाश्वत सुखासाठी नात्यातील सामंजस्यपूर्ण गोडवा जपणे आवश्यक आहे.असे मत सौ.स्मिता जोशी यांनी व्यक्त केले.

व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून : प्रेमभावना कि कामभावना’ या विषया वरील परिसंवादाचे नियोजन.

 

दि.१३/०२/२०२१ :
क.बावडा,प्रतिनिधी : प्रणाली सातपुते

महावीर महाविद्यालय,कोल्हापूर (मानसशास्त्र विभाग), वुई केअर सोशल फौंडेशन,कोल्हापूर व यशवंतराव चव्हाणमुक्त विद्यापीठ, मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॅलेंटाईनडे दिनानिमित्त ‘व्हॅलेंटाईन डे : प्रेमभावना कि कामभावना’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

 

‘लग्नसंस्था व कायदा’ या विषयावर समुपदेशिका सौ. स्मिता जोशी यांनी “ शाश्वत सुखासाठी नात्यातील सामंजस्य पूर्ण गोडवा जपणे आवश्यक’ असलेचे मत व्यक्त केले. तसेच लग्नसंस्थेच्या विविध प्रकारांवर चर्चा केली. ‘

व्हॅलेंटाईनडे : प्रेमभावना कि कामभावना’ विषयावर आयोजित परिसंवादात समुपदेशिका सौ. पूजा इंगवले यांनी ‘प्रेमभावना व कामभावना’ या विषयावर तरुणांची व पालकांची मते जाणून घेऊन चर्चा केली. तसेच डॉ. सुरेश संकपाळ यांनी लग्न केलेल्या काही जोडप्यांची मुलाखत घेतली या मुलाखती मधून प्रेमाचा नेमकाअर्थ जाणून घेण्यात आला. ‘प्रेम म्हणजे नक्की काय असतं.. ?’ या विषयावर परिसंवादात डॉ.शिरीष शितोळे यांनी संवाद साधताना “प्रेम करत असताना फक्त शारीरिक सौंदर्याला महत्व न देता आपल्या जोडीदारा मधील विविध पैलूं ओळखून ते स्वीकारणे व जपणे म्हणजेच खरे प्रेम” असे मत मांडले.

 

 

या परिसंवादात अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. भरत नाईक (विभागप्रमुख, मानसशास्त्र विभाग), डॉ.महादेव शिंदे ( केंद्र संयोजक,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र ), श्री.सुदर्शन पांढरे(अध्यक्ष, वुई केअर सोशल फौंडेशन), कु. मनीषा धमोणे, कु. अश्विनी पाटील, श्री. रुपेश कांबळे, श्री. प्रमोद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सलमान मुजावर यांनी केले. तर कार्यक्रम समन्वयक म्हणून श्री. विजयकुमार मुत्नाळे व श्री.इम्रान शेख यांनी काम पहिले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, सामाजिक सेवा संस्था सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close