सामाजिक

कासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

टोप प्रतिनिधी ,

दि.१४/०५/२०२१,

येथील गोकुळची मारुती दूध संस्था उत्पादकांना दरवर्षी यात्रेला लाभांश वाटप करते. गावची यात्रा रद्द झाले तरी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात दूध उत्पादक सभासदांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यातच घरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर औषधोपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. दूध उत्पादकांना आर्थिक मदत दिली जावी व त्यांना आर्थिक आधार दिला जावा यासाठी मारुती दूध संस्था संचालक मंडळाने दूध उत्पादकांना लिटरला म्हैस ३.२५ , गाय १.७५ रुपयांप्रमाणे लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्याप्रमाणे ४० दूध उत्पादक सभासदांना २ लाखांचे वाटप करण्यात आले.
यावेळी चेअरमन बाबासो घाटगे, संचालक पांडुरंग लुगडे, उत्तम वडिंगेकर, शिवाजी घाटगे, तानाजी तेलवेकर, सोपान माने, शिवाजी चेचरे,बाबासो भांदीगरे, नामदेव घाटगे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

 

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close