सामाजिक

कामधेनू दूध संस्थेच्यावतीने दूध उत्पादकांना ११ लाख ७० हजार रुपयांचे वाटप

यात्रेदिनी अर्धा किलो श्रीखंड वाटप करणार

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

दि.२६/०४/२०२१.

पाडळी : येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासद कमल जाधव   यांना ठेव,व्याज, फरकबिल व बिल वाटप प्रसंगी मोहन पाटील, विनोद पाटील, श्रीधर पाटील, अभिजित पाटील आदी.

घुणकी, ता.२५ : पाडळी (ता.हातकणंगले) येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना यात्रेनिमित्त दूध बिलातून कपात केलेली ५ टक्के ठेव व्याज, फरकबिल ११ लाख ७० हजार रुपये वाटप करण्यात आले.
तसेच ४०० हून अधिक दूध उत्पादक सभासदांना यात्रेदिवशी २९ एप्रिल ला प्रति अर्धा किलो श्रीखंड वाटप करण्यात येणार आहे.
दूध उत्पादकांना बचतीची सवय लागावी व यात्रेच्यावेळी दूध उत्पादकांना आर्थिक अडचण येऊ नये या हेतूने दूध बिलातून ५ टक्के ठेव कपात करण्यात येते. ५ टक्के प्रमाणे ७ लाख ५० हजार रुपये, ३.लाख ५० हजार रुपये व्याज, मेंबर शेअरवरती ९ टक्के प्रमाणे
लाभांश ७० हजार रुपये असे ११ लाख ७० हजार रुपयांचे वाटप अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष विक्रम मुळीक, संचालकविनोद पाटील, संपतराव पाटील, बाळासाहेब जाधव, श्रीधर पाटील, शशिकांत पाटील, धनाजी दाभाडे, सय्यद पठाण, निवृत्ती गायकवाड, सुभाष सवळेकरी, विमल जाधव, सुरेखा पाटील, सचिव तानाजी पाटील यांच्या हस्ते झाले.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close