धार्मिक
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा
परत इतिहासाची पुनरावृत्ती: गेल्या वर्षी चौथ्या खेट्याला मंदिर बंद झाले होते, तर या वर्षी चार ही खेटे होणार नाहीत.

महाराष्ट्र लाईव्ह वृत्त सेवा : जोतिबा डोंगर
दि.२६/०२/२०२१
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ,वाडीरत्नागिरी येथे दि.२८ फेब्रुवारी पासून खेटे यात्रेला प्रारंभ होत आहे. यामध्ये 2८ फेब्रुवारी पासून पुढील चार रविवार समावेश आहे, गेल्या वर्षी चौथ्या खेट्यापासूनच मंदिर दर्शनासाठी कोरोनाच्या पाश्वभूमीवर बंद करण्यात आले होते , या खेटे यात्रे दरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर परिसरात होत असते त्या अनुषंगाने कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यात्रा, उत्सव ,उरूस, इ.चे नियोजन करण्यास बंदी घातलेली आहे. त्यामुळे वाडीरत्नागिरी ,जोतिबा डोंगर येथील २८ फेब्रुवारी पासून पुढे चार रविवारी संपन्न होणारे खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत असे जिल्हाधिकारी यांनी देवस्थान समितीला सूचित केले आहे.
पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी करणेस आणि कमीत कमी मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत पूजा करणेस परवानगी देण्यात आली आहे.तथापि सदर श्री जोतिबा खेटे कार्यक्रमास भाविकांना आणि नागरिकांना प्रवेश देऊ नये असे ही सांगण्यात आले आहे.एकंदरीत या वर्षीचे सर्व खेटे हे भाविकांच्या शिवाय संपन्न होणार