धार्मिक

फक्त एकवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार जोतिबा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा

जोतिबा चैत्र यात्रेच्या धार्मिक विधीसाठी प्रशासन सज्जएकवीस मानकरी यांच्या उपस्तिथीत होणार धार्मिक सोहळा: पालखी राजमार्गावरूनच प्रस्थान करणार

 

 

महाराष्ट्र लाईव्ह वृृत्तसेेवा : जोतिबा डोंगर,

दि.२४/०४/२०२१.

श्री जोतिबा डोंगरावर येत्या सव्वीस एप्रिल रोजी (सोमवारी ) होणारी सर्वात मोठी असणारी चैत्र यात्रा पार पडणार असून .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यांदा ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून फक्त धार्मिक विधी यावेळी होणार आहे .गेल्यावर्षी कोरोनामुळे जोतिबा देवाचा पालखी सोहळा हा टेम्पोमधून नेऊन धार्मिक विधी पार पडला होता .यावेळी ग्रामस्थ पुजारी यांच्या बैठकीत प्रशासनाला धार्मिक विधिबाबत श्रींचा पालखी सोहळा हा राजमार्गावरूनच घ्यावा यासंदर्भात सर्व जबाबदारी घेऊ अशी मागणी ग्रामस्थ पुजारी यांनी केली .शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई ,पन्हाळा शाहूवाडी आमदार विनय कोरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत देवाचा धार्मिक विधी फक्त एकवीस लोकांच्या उपस्तीत होईल असा शिक्का मोर्तब झाला पालखी राजमार्गावरूनच पारंपरिक (मार्गावरून) नेण्याचा निर्णय झाला .याचबरोबर उपस्तिथीत असणाऱ्या मानकर्यांची कोविड चाचणी केली जाईल यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल असा चर्चात्मक तोडगा निघाला।

यात्रेच्या मुख्य दिवसावेळी कडक पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात येणार असल्याने सर्व मार्ग कडक बंद केले जाईल अशी भूमिका प्रशासनाने घेतली.

पालखी सोहळ्याच्या धार्मिक विधिबाबत झालेल्या निर्णया नंतर ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close