धार्मिक

दख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.

महाराष्ट्र लाईव्ह न्युज वृत्तसेवा : जोतिबा डोंगर  १४जानेवारी २०२०.

कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर तब्बल सहा महिने सर्व धार्मिक स्थळे प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, दीपावली पाडव्यापासून प्रायोगिक तत्वावर प्रशासनाने भाविक भक्तांसाठी मंदिरे खुली केली. तेव्हा पासून जोतिबा डोंगरवर भाविकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. सुन्न पडलेला परिसर दिवसेंदिवस गजबजलेला पहावयास मिळत आहे.
अखंड महाराष्ट्रासहित कर्नाटक, आंध्र, गुजरात या राज्याचे
कुलदैवत श्री दख्खनचा राजा जोतिबांची आज मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली .ही पूजा पुजारी श्री प्रकाश सांगळे , श्री नंदकुमार मिटके , श्री दादासो मिटके, श्री अनिल मिटके , श्री कृष्णात मिटके, श्री दत्तात्रय मिटके, यांनी बांधली. विविध सण सोहळ्यामध्ये दख्खनचा राजा श्री जोतिबांची विविध अवतारामध्ये महापूजा साकारल्या जातात.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close