धार्मिक

दख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

दि.११/०३/२०२१.

जोतिबा डोंगर,

श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील श्री दख्खनचा राजा जोतिबाची आज महाशिवरात्रीनिमित्त दुपारी तीन च्या अभिषेक नंतर भगवान शिवशंकर रूपातील विशेष महापूजा बांधण्यात आली ही महापूजा श्रींचे मुख्य पुजारी श्री जालिंदर झुगर तसेच पुजारी श्री गणेश झुगर, प्रकाश सांगळे भानुदास ठाकरे ,यांनी ही पूजा साकारली.

दख्खनचा राजा श्री जोतिबाचे मंदिर सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. मंदिरातील सर्व धार्मिक विधी ,पूजा नित्यनियमाने सुरू असते .कोरोनाचा सध्याचा वाढता आलेख बघता जिल्हा प्रशासनाने जोतिबा डोंगरावरील होणारे खेट्याचे रविवार बंद केल्यामुळे रविवारी सर्वत्र शुकशुकाट असतो, परिणामी व्यापारी व दुकानदार यांचे या बंदमुळे आर्थिक नुकसान पाहायला मिळतेय , रविवारी बंद असल्यामुळे सोमवार ते शनिवार या दिवशी भाविक दर्शनासाठी येताना दिसत आहेत.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close