धार्मिक

दख्खनचा राजा जोतिबाचा पहिला खेटा निरामय शांततेत भाविकांच्या विना संपन्न

ना चांगभलं चा गजर, ना गुलाल खोबऱ्याची उधळण.! सर्व मार्गावर पोलीस तैनात !

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

दि.०१/०३/२०२१.

जोतिबा डोंगर.

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा मानाचा पहिला खेटा रविवार भविकांविना पार पडला कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जोतिबा डोंगरावरील सर्व खेटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

शनिवारी रात्री पासूनच खबरदारी म्ह्णून जोतिबा डोंगरावर येणारे सर्व रस्ते पोलिसानी बॅरिकेट लावून बंद केले होते व कडक पहारा दिला होता त्यामुळे येणारे भाविक परत पाठवण्यात आले

रविवारी जोतिबा डोंगरावर शुकशुकाट पाहायला मिळाला
गर्दीने भरून गच्च जाणाऱ्या बाजारपेठा देखील भाविक नसल्याने व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या गुलालाची उधळणीत आणि चांगभलच्या गाजराने फुलुन जाणारा मंदिर परिसर भयानक शांततेत राहिला

गायमुख मार्गे फरसबंदी वाटेवर कोल्हापूरकर चालत येत असत या वाटेवर देखील पोलिसांनी प्रवेश बंदी घातल्याने या मार्गावर देखील शुकशुकाट पाहायला मिळाला

मंदिराचा दिनक्रम मात्र नित्य नियमानुसार झाला पहाटे चार वाजता घंटा नाद झाला श्रींची पाद्यपूजा व काकड आरती झाली सकाळी आठ वाजता जोतिबा देवास अभिषेक घातला व खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली

अकरा वाजता श्रींचा धुपआरती सोहळा झाला
सायंकाळी आठ वाजता मानकरी व पुजारी यांच्या उपस्थित श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला

गेल्या वर्षी याच खेट्याच्या कालावधीमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता याला पाचव्या खेट्या ला वर्षपूर्ती होते यातच चालू वर्षातील पाचही खेटे रद्द करण्यात आले आहे

रविवारी
कुशिरे फाटा ,गायमुख मार्ग गिरोली फाटा ,दानेवाडी फाटा याठिकाणी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close