धार्मिक
गडमुडशिंगीत त्रिवार्षिक बिरदेव यात्रा अखेर रद्द

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर
कोल्हापूर प्रतिनिधी : ओंकार लाड
उजळाईवाडी, दि.०३/०३/२०२१
गडमुडशिंगी(ता. करवीर) येथील ग्रामदैवत
श्री. धूळसिद्ध देवाची त्रिवार्षिक यात्रा कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय गांधीनगर पोलीस, गडमुडशिंगी ग्रामपंचायत, हक्कदार पुजारी, व ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यात्रा 27 फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान भरणार होती. यात्रेत होणार सर्व करमूणुकीचे कार्यक्रम, कुस्ती, धावणे, सायकलिंग, यासारख्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून पाहुणे व मित्र मंडळीना यात्रेसाठी निमंत्रित न करण्याचा आव्हान करण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीत यंदाची यात्रा ही रद्द करण्यात आली .