राजकीय

सीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील

दि.२८/०२/२०२१.

मुंबई :- राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांनी नियुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या कार्यालयानं ट्विटरवरून दिली. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी १९८५ च्या बॅचच्या सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांची नावे चर्चेत होती.

यापैकी सीताराम कुंटे सध्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहेत, तर प्रवीण परदेशी हे संयुक्त राष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. मुख्य चर्चेतील दोन्ही नावांपैकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीताराम कुंटे यांच्या नावाला पसंती दिल्यानं ते आता राज्याचे मुख्य सचिव झालेत. सीताराम कुंटे यांना एकूण 9 महिन्याचा राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यकाल मिळणार आहे, कारण नोव्हेंबर 2021 मध्ये तेही सेवानिवृत्त होणार आहेत. विशेष म्हणजे सीताराम कुंटे व प्रवीण परदेशी हे दोघेही १९८५ च्या बॅचचे आहेत.

सीताराम कुंटे यांनी महाराष्ट्राच्या शासनाच्या प्रशासनामध्ये विविध विभागात काम पाहिले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने म्हाडाच्या प्रमुखपदी, मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी तसेच अतिरिक्त आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी तसेच गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर सेवा बजावल्या आहेत. अशा पध्दतीने महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागात सेवा केल्याचा अनुभव त्याच्याकडे आहे.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close