राजकीय
शे.का.पक्षाचे केरबा भाऊ पाटील यांचा गोकुळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,
राधानगरी प्रतिनिधी : सुहास निल्ले
दि.२६/०३/२०२१.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा गोकुळ दूध संघाच्या येत्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे करवीर तालुका चिटणीस व भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील कोथळीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत श्रीपती पाटील हसूर दुमाला,पांडुरंग मुसळे परिते,शरद पाटील,संग्राम पाटील,भगवान पाटील, विलास पाटील आदीसह भोगावती परिसरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.गोकुळच्या विरोधी आघाडीतून श्री पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचे समजते.
——————-
