राजकीय
वीज तोडणी तूर्तास थांबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात घोषणा

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर
दि.०२/०३/२०२१
मुंबई: सध्या वाढीव वीज बिलाबाबत सर्वजण त्रस्त झालेले दिसून येत आहेत, त्यामुळे राज्यभरात भाजपनं आंदोलन केल्यानंतर आज विधिमंडळात भाजप ने आक्रमक भूमिका घेतली, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी तूर्तास थांबवा असे आदेश दिले.
अजित पवार म्हणाले जोपर्यंत वीज बिलावर सभागृहात चर्चा होऊन त्यावर तोडगा होत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक, आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशा प्रकारची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले वीज बिलाबाबत चर्चा करावी. इतर सर्व विषय बाजूला ठेवावेत अशीच आमची भूमिका आहे. सभागृहात भाजप आक्रमक झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ,दोन्ही बाजूच्या सभासदांचे सामाधान झाल्यानंतर विजेबाबत निर्णय होईल, तोपर्यंत वीज तोडता येणार नाही. वीज कनेक्शन बाबत चर्चा करण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.
यावर फडणवीस म्हणाले की ,या निर्णयाबद्दल दादांचे आभार अशी त्यांनी भूमिका मांडली आणि ज्यांचे कनेक्शन तोडली आहेत त्यांची कनेक्शन जोडून द्या, असे प्रतिपादन त्यांनी केले.