राजकीय
राज्यातील ग्रामपंचायती होणार मालामाल – १५ व्या वित्त आयोगाव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मिळणार वेगळा निधी

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर
मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील
पुणे:-
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात सरपंच आणि ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना राज्यातील ग्रामपंचायतींना गावांच्या विकासासाठी आणखी राज्य सरकारकडून 29 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केली.
याअगोदर राज्यातील ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून मुबलक निधी मिळाला आहे. त्यानुसार या निधीचा वापर हा गावाच्या उन्नतीसाठी खर्च करून हा पैसा सत्कारणी लावावा. या निधीतील पैसा गावातील शाळा सुंदर व स्वच्छ करण्यासाठी, स्वच्छ पिण्याचे पाणी, गावातील रस्ते इ. गावातील पायाभूत सुविधावर खर्च करून गावे स्वयंपूर्ण बनवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी पुणे जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांना दिला.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पशुसंवर्धन व कृषी सभापती बाबूराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे उपस्थित होते.