राजकीय

नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2020-21 चा सुधारित व सन 2021-22 चा मूळ लोकाभिमुख अर्थसंकल्प

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील 

 

नवी मुंबई- 

नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2020-21 चा सुधारित आणि सन 2021 – 22 चा मूळ अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. अभिजीत बांगर यांनी मंजूर केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तसेच अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 2339.62 कोटी व रु. 2369.73 कोटी जमा आणि रु. 3081.93 कोटी खर्चाचे सन 2020-21 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 1627.42 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 4825 कोटी जमा व रु. 4822.30 कोटी खर्चाचे आणि रु.2.70 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2021-22 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचेही अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close