
महाराष्ट्र लाईव्ह न्युज ,वृत्तसेवा : जोतिबा डोंगर.
क.बावडा प्रतिनिधी : प्रणाली सातपुते,
दि.१५/०२/२०२१
कोरोनाच्या महामारी मुळे सर्व देशभर लॉकडाउन करण्यात आला होता. या काळामध्ये संपूर्ण जणजीवन ठप्प झाले होतेमहाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय 11महिन्यापासून बंद होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिलेल्या परवानगी नुसार आजपासून महाविद्यालय 50%उपस्थितीत सुरु झाली. दहा महिन्यानंतर महाविद्यालय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजला होता. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सोमवार पासून सुरू झाले. प्रथम नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात आले होते. नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. गेली दहा महिन्यानंतर महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर आज गजबजून आला. महाविद्यालयीन वर्ग सोमवारपासून सुरू झाले. महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाने नियम घालून दिले आहेत त्याप्रमाणे महाविद्यालयांमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग सॅनिटायझर देऊनच विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश दिला जात आहे.
आज महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या सर्व नियमांचे पालन करण्यास सांगितले.
कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आज लॉकडाऊन नंतर भेटलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या ऑनलाइन लेक्चर, अभ्यासक्रम, परीक्षा वेळापत्रक, यावर गप्पागोष्टी रंगल्या होत्या.