राजकीय

*खानापुरमध्ये आमदार प्रकाश आबिटकर गटाची सत्ता*

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना धक्का

गारगोटी दि.१८(प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या चर्चेत असणारी भुदरगड तालुक्यातील खानापुर ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्ता खेचून आणली संत्तातर घडवून आणले.आमदार प्रकाश आबिटकर गटाचे ६ सदस्य निवडून आले तर भाजप चे ३ सदस्य निवडून आले .आमदार चंद्रकांत पाटील यांनी खानापुर गावासाठी प्रचंड प्रमाणात निधी दिला होता तरीही या गावातील लोकांनी शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पॅनेलला बहुमत दिले व ग्रामपंचायत मध्ये सत्ता बदल केला .कृषी उत्पन बाजार समिती माजी संचालक बाळासाहेब भोपळे हे शिवसेनेचे आघाडी प्रमुख होते .खानापुर गावामध्ये ग्रामपंचायतीवर शिवसेनेने प्रथमच भगवा फडकवला आहे.

Vikram Chougale

Contact ME : 9923673632

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close