राष्ट्रीय
टोल नाक्यावर आजपासून Fastag अनिवार्य करण्यात आला.
ज्यांच्याकडे fastag नाही त्या वाहन धारकाकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार

महाराष्ट्र लाईव्ह न्युज नेटवर्क : जोतिबा डोंगर
दि.१५/०२/२०२१.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाने रविवारी रात्री 12 वाजल्यापासून सर्व टोल नाक्यावर fastag च्या माध्यमातून वाहन धारकांना टोल भरणे सक्तीचे केले आहे.
यापूर्वी fastag चा निर्णय 1 जानेवारी पासून अंमलात येणार होता पण त्यापासून काही कालावधी वाढवण्यात आला होता, पण आता मात्र fastag च्या निर्णयाच्या मुदतीला वाढवण्यात येणार नसल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून सर्व टोल नाक्यावर कोणत्याही स्वरूपाचा वाद होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत