गावकट्टा
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील यमाई बाग परिसरात स्वच्छता मोहिम*

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर
दि.२६/०२/२०२१
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील श्री यमाई मंदिर परिसरातील यमाई बाग येथे युवा नेते श्री ओंकार सांगळे, आणि श्री यशवंत चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली नो मर्सि ग्रुप च्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.
सर्व सदस्यांनी कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावली आणि सारा परिसर अगदी नैसर्गिकरूपाने स्वच्छ करून आपल्या परिसराची आपली स्वच्छता असा सर्वांना संदेश दिला. या मोहिमेत युवा नेते ओंकार सांगळे, श्री यशवंत चौगले, विशाल आमाणे, अक्षय सांगळे, विकास कुरुद, संतोष ठाकरे, स्वप्नील ठाकरे, सुरज बुने, सौरभ दादरणे सहभागी होते