गावकट्टा
शिरोली येथे महाराष्ट्र पान व चहा व्यावसायिक धारक सेवा मंडळाच्या नामफलकाचे अनावरण
सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रम .

टोप प्रतिनिधी :
दि.१६/०२/२०२१
शिरोली : ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला राजाचा दर्जा मिळाला आणि त्याच्या हक्काचे संरक्षण करण्यात आले आहे. नागरिकांनी या कायद्याने मिळालेल्या अधिकारांची माहिती करुन घेतल्यास फसवणूक होणार नाही असे प्रतिपादन प्रांत ग्राहक संरक्षण सचिव महाराष्ट्र गोवा दीव दमणच्या विद्या चव्हाण यानी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील जय महाराष्ट्र पान व चहा व्यवसायिक धारक सेवा मंडळाचे २५ रौप्य महोत्सवानिमित्त सेवा मंडळाच्या नामफलकाचे अनावरण व ड्रेस वाटप प्रसंगी बोलताना व्यक्त केले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांगभलं ट्रस्टचे अध्यक्ष केरबा पाटील होते. तर प्रमुख पाहूने प्रांत ग्राहक संरक्षक महाराष्ट्र गोवा दिवस दमन राज्याकार्यध्यक्ष अजित देसाई होते .
यावेळी अजित देसाई म्हणाले कि ऑनलाइन व्यवहारामुळे ग्राहक व विक्रेता यांचे एकमेकांना दर्शनही न घडता व्यवहार शक्य झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता वाढली आहे त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत ग्राहकाला संरक्षणाची गरजही वाढली आहे जर कोणत्याही ग्राहकांची फसवणूक होत असेल असे वाटल्यास त्यानी आपली तक्रार आमच्याकडे करा आपण त्यास न्याय मिळवून देवू असे त्यानी सांगितले .
यावेळी केरबा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . तर सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडूरंग करंडे यानी प्रमुख पाहूण्यांचे स्वागत करत सेवा मंडळाच्या २५ व्या रौप्य महोत्सव वर्षात पदार्पणाचा आढावा सादर केला .
यावेळी सुभाष गावडे, सुभाष पुजारी , भिमराव कोरे , उत्सला लोंढे , लक्षीबाई खोपकर, लक्षीबाई कदम , सतिश भिलवडीकर , भगवान शिंदे , सागर गडकरी , रंजना चव्हाण , जीता राजभर , आदिसह उपस्थित होते .