गावकट्टा
रोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर
दि.०२/०३/२०२१.
रोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतीबा डोंगर येथील परिसरात कचरा पेट्या बसवल्या व या परिसराची स्वच्छता केली
जोतिबा डोंगर येथील यात्रा बस स्थानक येथील बागेमध्ये भाविकांची वर्दळ असते यातच खाद्यपदार्थ ,पत्रावळ्या प्लास्टिक यासारख्या वस्तू तश्याच टाकल्या जातात याची योग्य विल्हेवाट लागावी यासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा यांनी २१ कचरा कुंड्या बसवल्या व परिसर स्वच्छता केली यावेळी या क्लबचे प्रेसिडन्ट राज बुने,अमोल मिटके ,विश्वनाथ मिटके,पिंटू बुने,निखिल धडेल,ओम ढोली,विश्वजित ठाकरे,मानसी बुने,वर्षा बुने,किरण आमाणे ,वैष्णवी मिटके,सुरज बुने,स्वप्नील ठाकरे ,दीपक शिंगे,अमर झुगर,शिवाजी कांबळे उपस्थित होते