गावकट्टा

पाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

दि.२८/०२/२०२१.

पाडळी (ता.हातकणंगले)

येथे कामधेनू सह. दूध संस्था व गोदरेज अँग्रोवेटच्या वतीने जातीवंत जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले.या प्रदर्शनात गावातील शंभर शेतकऱ्यांनी विविध जातींच्या गाई व म्हैशीसह सहभाग घेतला. हे प्रदर्शन मोठ्या उत्साहात शनिवार ( दि. २७) रोजी पार पडले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, जातिवंत जनावरांची पैदास शेतकऱ्यांनी आपल्याच गोठ्यात करण्याच्या उद्देशानेच प्रदर्शन आयोजित केले असल्याचे चेअरमन मोहन पाटील यांनी सांगितले.यात शिवाजी जाधव, विलास कोगेकर,विकास पाटील यांच्यासह सर्वोत्कृष्ट म्हणून गौरविलेल्या जनावरांच्या मालकांना रोख बक्षिसे दिली.प्रदर्शनात सहभागी सर्वानां भेटवस्तू दिल्या.
यासाठी गोदरेज अँग्रोवेट जनरल मॅनेजर समीर रायकर, पुणे मॅनेजर संदीप शेळके, धनाजी पाटील,रमेश माळी यांनी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांनी जनावरांची निगा राखून उच्च प्रतीचे दुधाचा पुरवठा करावा असे मत विनोद पाटील यांनी सर्वांचे स्वागत करत
  प्रास्ताविकात व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील,संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन,सर्व संचालक, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close