गावकट्टा
पन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर.
दि.०१/०३/२०२१.
वाढत्या पेट्रोलच्या दरवाढी विरोधात पन्हाळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने वाघबीळ येथिल पेट्रोल पंपांवर चूल पेटवा आंदोलन करण्यात आले पन्हाळा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वाघबीळ येथील दिपराज पेट्रोल पंपामध्ये जाऊन चूल मांडण्यात आली केंद्र सरकारचा निषेध करून
वाढत्या पेट्रोल दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असून पेट्रोलचे दर कमी करावे यासठी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा सरचिटणीस राधिका शेलार ,पन्हाळा तालुका अध्यक्षा राधा बुने ,सरचिटणीस इंद्रायणी चौगले, आनंद धडेल,दादा पाटील (जाफळे) व महिला उपस्थित होत्या